दर्जाहीन काम केल्याने पुराच्या पाण्याने पिचिंग गेली वाहून

Foto
नव्याने सुरू असलेल्या गार्ड वॉलचे कामही दर्जाहीन, चौकशीची मागणी

रमेश लिंबोरे

पैठण जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेले जलविद्युत केंद्र काहीना काही कारणाने अनेक वर्षांपासून बंद असून, सध्या येथे सुरू असलेल्या कोट्यवधींच्या दुरुस्ती च्या कामांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
गुणवत्तेवर शंका निर्माण झाली.

तीन वर्षांपूर्वी जवळपास सुमारे ७० लाख रुपये खर्चुन पिचिंग चे काम व भराव चे काम करण्यात आले होते परंतु ते भराव व पिचिंग नाथ सागर जलाशयातून पाणी सोडल्यानंतर वाहून गेल्याने कामाच्या गुणवत्तेवर शंका निर्माण झाली आहे. आता याच ठिकाणी सुमारे ६ कोटी रुपये खर्चुन गार्ड वॉल उभारण्याचे काम सुरू आहे सदरील काम सुद्धा दर्जाहीन केले जात असून कामावर जबाबदार अधिकारी फिरकत नसल्याचे दिसत आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून ओळख असलेल्या नाथ सागर जलाशय परिसरात पाटबंधारे विभागाकडून कोटी रुपयांच्या विविध १० दुरुस्ती कामांना सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. कामांवर देखरेख ठेवणारी प्रभावी यंत्रणा नसल्याने संबंधित अधिकारीच दर्जा ठरवत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच धरणाला भेट दिली; मात्र सुरू असलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबत त्यांनी भाष्य केले नसल्याने शंका अधिकच बळावल्या आहेत. यासर्व कामाकडे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत, शाखा अभियंता हे दुर्लक्ष करत दिसत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. सदरील कामांकडे अभियंता श्रद्धा निंबाळकर यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणीही पुढे येत आहे.

या कामाच्या गुणवत्तेची दरम्यान, नाथ सागर जलाशय परिसरात कोट्यवधींची कामे सुरू असताना कोणतीही सक्षम नियंत्रण यंत्रणा दिसत नाही. थातुरमातुर कामे होत असून या कामाच्या गुणवत्तेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहे.

-- कोट्यवधींच्या कामांवर देखरेखीचा अभाव --

आता सागर जलाशयावर मागील तीन वर्षांत जवळपास १०० कोटी रुपयांच्या विविध तांत्रिक दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, या कामांचे परीक्षण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या केलेल्या पिचिंग चे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याने पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेले. सध्या गार्ड वॉल काम सुरू असून तेही दर्जाहीन होत असल्याचे दिसत आहे.